Monday, December 23, 2024
Homeराज्यआद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती कायम रुजविण्याचा पत्रकार राजेश राजोरे यांचा...

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती कायम रुजविण्याचा पत्रकार राजेश राजोरे यांचा अभीनंदनिय उपक्रम…

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, प्रबोधन केले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास 183 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला.

त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी सर्वत्र पत्रकार दिन साजरा होतो आचार्य बाळशास्त्री जांभेकराच्या या कार्याची महती नवेदीत पत्रकार व समाजा समोर उभी राहावी या साठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धपुतळा येत्या मराठी पत्रकारदिनी, शुक्रवार, 6 जानेवारीला दुपारी 3 वाजता टिळक पत्रकार भवनात नागपूर येथे स्थापित केला जाणार आहे.

टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात येईल ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक देशोन्नतीच्या बुलढाणा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांनी हा अर्धपुतळा नागपूर श्रमिक पत्रकार संघाला भेट दिला आहे.

तसेच खामगाव वाशीम, संग्रामपूर आणि देऊळगावराजा येथील पत्रकार संघांनाही त्यांनी असाच अर्धपुतळा भेट दिला आहे यापूर्वी खामगाव व बुलडाणा येथेही सदर पुतळे त्यांनी दिले आहेत. ही बाब माध्यम क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येका साठी प्रेरणादाई आहे राजोरे यांच्या या संकल्पामुळे प्रसार मध्यमा समोर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास सदैव तेवत राहील आणि या पुतळ्याच्या स्मृतीतुन एक आदर्श पत्रकारिता घडेल सोबतच समाजामध्ये प्रसार माद्यमाची महती वृद्धिंगत होईल या बाबत आत्मविश्वास वाटू लागला आहे.

राजेश राजोरे यांच्या या व पत्रकारितेतील 39 वर्षाच्या योगदानाचे पत्रकारांचे वतीने करावे तेवढे कौतुक थोडे आहे. कारण त्यांना सुचलेली ही संकल्पना खऱ्या अर्थाने वृत्तपत्र सृष्टी साठी अखंडप्राय आहे भविष्यात ती कायम सरूपी टिकणारी व रुजणारी आहे प्रिय मित्र राजेशजी राजोरे यांचे पुनःश्च अभिनंदन व त्यांच्या या मौलिक कार्याला शुभेच्छा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: