प्रतिनिधी हेमंत जाधव
वसुनंदिनी फाउंडेशन जामनेरच्या प्रथम वर्षातील राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२३ सामाजिक कार्यात व पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पत्रकार मुबारक खान यांना देवून सन्मानित करण्यात आले आहे.
जळगाव खांदेश येथील ब्राह्मण सभा बळीराम पेठ येथे वितरण आणि सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सौ.सुनिता मोडक संस्थापक अध्यक्ष कल्याणी महीला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक, प्रमुख पाहुणे प्रिया प्रमोद दामले, चित्रपट निर्मिती प्रमुख तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, विशाल नामदेव शिरसाट संस्थापक भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच पुणे, विठ्ठल किसन आहेर पुणे प्रख्यात आरोग्य तज्ञ, सौ. नयना उगले उपाध्यक्ष कल्याणी संस्था रोजगार विभाग कोषाध्यक्ष कला भ्रमंती संस्था,
विशेष उपस्थिती, डॉक्टर मनिषा पंकज गांगुर्डे एन वाय हेल्थकेअर फाउंडेशन डोंबिवली, अश्विनी अशोक डोलारे कोर्ट कमिशनर जळगाव महानगरपालिका, श्रीमती प्रज्ञा अरुण कांबळे ज्येष्ठ समाजसेविका, अभिनेत्री वर्षा देशमुख शितोळे लेखिका गायिका नाशिक उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यात व पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल सा.बुलडाणा साहसिकचे संपादक मुबाकर खान यांना अभिनेत्री वर्षा देशमुख शितोळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्हे देवून महाराष्ट्र भुषण पुरस्कार २०२३ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन संचालक विद्याधर सोनवणे वसुनंदिनी फाउंडेशन, व संचालिका सौ. माधुरी कुलकर्णी यांनी केले होते.