Sunday, December 22, 2024
Homeराज्यकोरपना तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या अध्यक्षपदी जोत्सना कोडापे यांची नियुक्ती…

कोरपना तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या अध्यक्षपदी जोत्सना कोडापे यांची नियुक्ती…

राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ति पत्र…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थीतीत चन्द्रपुर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस आयोजित बुथ व तालुका पदाधिकारीची आढावा बैठक जिल्हा राष्ट्रवादी कॉगेस अध्यक्ष नितिन भटारकर यांनी आयोजित केली होती जिल्ह्यातील पक्ष संघटन व बुथ कमेटी आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच खासदार सुनिल तटकरे प्रदेश अध्यक्षानी ग्रामीण व शहरी भागात पक्षाचे कार्य व शासन घेत असलेल्या शेतकरी कामगाराचे निर्णय महिला ना सक्षमीकरण व रोजगार निर्मीती च्या योजना प्राधान्याने पोहचविण्यासाठी पक्ष पदाधिकारी यांनी प्राधान्यक्रमाने कार्य करावे गाव तिथे राष्ट्रवादी शाखा सुरु करावे पक्षसंघटन व कार्यकर्त्याची संख्या बळ हेच नेतुत्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेता सर्व फ्रन्ट व पक्षाचे पदाधिकारी यांनी आपले कार्य पुर्ण करावे यावेळी अनेक पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष राष्ट्वादी कॉग्रेस चे अध्यक्ष नितिन भटारकर यांनी करीत गेल्या ४ महिण्यात पक्षाचे संघटन बांधणी व जिल्हयात विविध पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या बैठकी व विधानसभा तालुका निहाय झालेल्या प्रगतीचा लेखाजोखा सादर करीत बुथ प्रगतीचा अहवाल व पक्षाच्या वाटचालीसाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना जबाबदारीने पक्षाच्या कार्यात सहभागी होऊन लवकरच बुथ व विविध फ्रन्टल च्या नियुक्ती पूर्ण करण्याचे आवाहन केले यावेळी जिल्ह्या भरातील विविध पदाधिकाऱ्याना राजेन्द्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले कोरपना तालुका अध्यक्ष म्हणून वनोजा येथिल जोत्सना कोडापे कार्यध्यक्ष म्हणून शालू धोटे यांना नियुक्त करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आबिद अली महिला जिल्हाध्यक्ष, रंजना पारशिवे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष, राकेश सोमानी विधानसभा अध्यक्ष, विलास नेरकर राष्ट्रवादी ओ. बि .सी .जिल्हा अध्यक्ष,अविनाश राऊत महेन्द्र चंदेल यांनी मार्गदर्शन केले जिल्हाया भरातून मोठ्या संख्येनी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: