अकोला – अमोल साबळे
तालुक्यातील बाळापूर नया अंदुरा कारंजा रमजानपुर येथील गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून जिओ नेटवर्क नसल्याने ग्राहकाना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मोबाईलच नेटवर्क नाही , फोन सुरू असताना अचानक कट होणे.. इंटरनेट ४-जी सेवा नेटवर्क सेवा बंद पडणे मिळणे. फोन गावातील गावात असतानादेखील फोन न लागणे अशा विविध कारणांमुळे जिओ मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पासून जिओ कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे जिओ ग्राहकांना आर्थिक भुर्दंड होत आहे
एकीकडे रिचार्ज दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिओ कंपनीने लवकरत नेटवर्क दुरुस्ती करावी अशी मागणी नया अंदुरा व कारंजा रमजानपूर येथील नागरिक करीत आहेत
पंधरा ते वीस दिवसांपासून जिओ नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल मध्ये रिचार्ज केले असून रिचार्ज पैसे व्यर्थ जात आहे
विष्णू मामणकार , जिओ ग्राहका नया अंदुरा
जिओ ग्राहकांना आर्थिक उदंड भरावा लागत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत त्यामुळे लवकरात लवकर नेटवर्क सुविधा करावी
गणेश शेगोकार , जिओ ग्राहक कारंजा रमजानपुर