अकोला – अमोल साबळे
असं म्हणतात की शालेय आयुष्याचा काळ, विशेषतः माध्यमिक शाळेचा काळ हा विसरता विसरला जात नाही. पुढे जाऊन तुम्ही करिअरची कितीही उत्तुंग शिखरे गाठली तरी शाळेचे दिवस आठवले की नकळत मन हळवे… व्याकूळ होते. आणि आठवणी मनात फेर धरून लागतात. या अल्लड वयातल्या आठवणींचा पट जिजामाता विद्यालयातील सण २००१ – २००२ च्या दहावीच्या बॅचच्या मित्र-मैत्रिणींनी पुन्हा तो तब्बल २२ वर्षांनंतर…
पायावाटांवरून पुढे निघून गेलेले, विस्मृतीत गेलेले मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकत्र येत आहेत. याच जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा २००१ – २००२ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी संत नगरी शेगाव येथे स्नेहसंमेलन संपन्न झाले. सुमारे असंख्य विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. प्रारंभ एकमेकांना पाहून सर्वजण भावुक झाले.
त्यानंतर प्रत्येकाने आपापल परिचय करून देत मनोगत व्यक्त केले मनोगतातून शालेय आठवणींन उजाळा देण्यात आला. माजी प्राचार्य कड सरांच्या आठवणींन उजाळा दिला. उपस्थित प्रत्येक मित्र-मैत्रिणीस आठवण म्हणून शिक्षकांना ट्रॉफी देण्यात आल्या.
यावेळी माझी प्राचार्य कड सर, जिजामाता विद्यालय प्राचार्य भगत सर तसेच गव्हाळे सर, कौलकार सर,अहिर सर, खोले सर, तळोकार सर,घुघरे सर, पाटकर सर, मुरे सर, वाघ मॅडम, शिंगणे मॅडम संपन्न झाले. माजी विद्यार्थी उमेश वाघ यांनी सूत्रसंचालन केले