Monday, December 23, 2024
Homeसामाजिकजिजामाता कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा येथे काळ्या फिती लावून शिक्षकांनी केला शासन...

जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा येथे काळ्या फिती लावून शिक्षकांनी केला शासन निर्णयाच निषेध…

अकोला – अमोल साबळे

दिनांक २५ सप्टेंबर नया अंदुरा. राज्यातील ६५ हजार जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण व राज्यातील शिक्षक भर्ती सह ८३ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरणे हे दोन काळे शासननिर्णय शासनाने काढले या शासन निर्णयाचा व राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १५ हजार जि.प.च्या शाळा बंद करण्याचा येऊ घातलेल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज जिजामाता विद्यालय,

क.महा.विद्यालय व एच.एस.सी.व्होकेशनल नया अंदुरा.ता.बाळापुर येथे आज दिनांक २५ सप्टेंबर २०२३ मुख्याध्यापक श्री.शेंगोकारसर, पर्यवेक्षक श्री.भगतसर, क.महा.विद्यालय व एच.एस.सी.व्होकेशनल सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी “काळ्या फिती” लावून कामकाज केले.

यावेळी मुख्याध्यापक एस. डि. शेंगोकार, पर्यवेक्षक आर बी भगत, जी.आर. इंगळे, जी. बी. चव्हाण, ए.पी. खिरोडकर ,ग्रंथपाल आर. डी. चितोडे, एम. एम. टिकार, व्हि. डी. कोवे, मुन्ना गव्हाळे, एस. एम. भामोदे, एस. व्ही. परळीकर,

महल्ले सर,आखरे सर, प्रा आर.पी.तराळे, एस. एम. शिंगोलकार, एस.एन. खडसे, एस. एम. कवळे, व्ही- झेड. ढवळे, आर के वाहुरकर,एल.एस तायडे, जे. व्ही. वानखडे, मेघा गांवडे, व्ही. एल. धनभर डी. एम. कडू, पी. डब्ल्यु. भटकर, एच. जे. नंदाने होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: