Thursday, January 9, 2025
Homeराज्यउमरी तालुक्यातील इंग्लिश स्कूलची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी -...

उमरी तालुक्यातील इंग्लिश स्कूलची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी – झुंजार क्रांती सेनेची मागणी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

सध्या चालू असलेल्या इंग्लिश स्कूल च्या फॅड मुळे ग्रामीण ते शहरी भागात आज काल सगळी कडेच इंग्लिश स्कूल मध्ये मुलांना शिक्षण देण्याची चढाओढ लागलेली आहे, इंग्लिश स्कूल मध्ये आपल्या पाल्याचे ऍडमिशन म्हणजे एक प्रकारची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र सर्वच भागातून दिसत आहे.

आणि याचा फायदा सध्या इंग्लिश स्कूल चालवणारे संचालक घेत असल्याचा प्रकार उमरी तालुक्यात खुलेआम सुरू आहे. इंग्लिश स्कूल चालवण्यासाठी शासन स्तरावरून त्यांना नियम व अटी लावलेल्या असतात मात्र त्या फक्त कागदावरच आहेत.

असे झुंझार क्रांती सेनेच्या शिरसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना सांगितले की उमरी तालुक्यात फक्त पाच इंग्लिश इंग्लिश स्कूल लाच मान्यता प्राप्त असून त्यातील 1ली ते 5 वी पर्यंत कक्षा मान्यता प्राप्त आलेल्या इंग्लिश स्कूल मध्ये 6वी ते 8वी चे वर्ग खुले आम शिकवले जातात.आणि ज्या इंग्लिश स्कूल ला 6वी ते 8वी ची मान्यता आहे त्या शाळेत 1ली ते 5 वी वर्ग मोठ मोठे बॅनर लावून घेतले जातात ह्या सर्व गोष्टी गट शिक्षण अधिकारी यांना दिसत नाहीत का?? मग ह्या गोष्टी कडे जाणीवपूर्वक काना डोळा का केल्या जात आहे.

इंग्लिश स्कूल मध्ये ने आण करण्यासाठी ज्या गाड्या लावण्यात आल्या आहेत त्या खासगी गाड्या लावून त्यामध्ये कोंबड्या भरल्यासारखे लहान मुलांना भरून वाहतूक केली जात आहे ह्या सर्व सुरू असलेल्या संस्थांवर केंद्र प्रमुख यांची देखरेख असायला होती मग शहरातच राहून ह्यांनी ह्या गोशी कडे दुर्लक्ष का केले?एका मोठ्या राजकारण्याच्या मुलीच्या शाळेवर 6वी ते 8वी पर्यंत मान्यता असते वेळी तिथे 1ली ते 5वी पर्यंत विद्यार्थी वर्ग मुख्य रस्त्या लागतच शिकवले जातात.त्या शाळेवर कार्यवाही का करण्यात येत नाही ??.

फिस च्या नावाखाली नर्सरी ला सुध्दा 10 हजार ते 12 हजार पर्यंत फीस आकारल्या जात आहे.त्यांना शिकवणारे शिक्षक ही 10 वी पास 12वी पास असलेले ह्यांना तुटपुंज्या मानधनावर नेमणूक करून लाखो रुपयांची फसवणूक पालकांकडून केली जात आहे ह्यावर योग्य ती चौकशी करून कार्यवाही करन्यात यावी अशी मागणी झुंजार सेनेच्या वतीने करण्यात आली असून चौकशी न केल्यास संविधानिक मार्गाने पुढील निर्णय घेणार असे शिरसे यांनी आमच्या प्रतीनिधीला सांगितले.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: