अतुल दंढारे –नरखेड-22
राज्यस्तरीय तांग सु डो स्पर्धा कोकणमठ र्शिर्डी येथे पार पडल्या . या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता. या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील देवग्राम येथील जीवन विकास विद्यालय यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये यश कैलास बागडे याने पुम्से या प्रकारात रजत पदक तर फाईट मध्ये कांस्य पदक प्राप्त केले. उत्कर्ष नवीन उनरकर याने पुम्से या प्रकारात कांस्य पदक तर फाईट मध्ये कांस्य पदक प्राप्त केले. कार्तिक देविदास जिचकार याने पुम्से या प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले . या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे सहभागी होऊन जवळ पास 1200 खेळाडू सहभागी झाले होते.
विजयी स्पर्धकांचे संस्थचे संस्थापक आदरणीय डॉ. भाऊसाहेब भोगे , संस्थेचे अध्यक्ष डॉ. विघे सर , प्राचार्य डॉ.देवेंद्र भोंगाडे सर , डॉ.योगेश सरोदे सर , शाळेचे मुख्याध्यापक श्री.हनुमंत रेवतकर सर , मुख्याध्यापक श्री. रविकांत बाविस्कर सर ,अंत्योदय स्पोर्ट्स ऍकडमी चे अध्यक्ष श्री.मंगेश निंबुकर तसेच शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. सर्व विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक मास्टर नरेंद्र बिहार, विदर्भ प्रमुख मास्टर किरण यादव, महाराष्ट्र प्रमुख मास्टर रॉकी डिसुझा, महाराष्ट्र सचिव सुभाष मोहिते व आई वडिलांना दिले. हे सर्व खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांचे मार्गदर्शन खाली सराव करतात.