Tuesday, November 5, 2024
Homeराज्यजीवन विकास विद्यालय देवग्राम (नरखेड) ची राज्यस्तरावर झेप...

जीवन विकास विद्यालय देवग्राम (नरखेड) ची राज्यस्तरावर झेप…

नरखेड – दि.1डिसेंबर 2022 ला सुगत बुद्ध विहार बाभुलबन नागपूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व जीत कुने डो असोसिएशन नागपूर यांच्या वतीने विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्याने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील देवग्राम येथील जीवन विकास विद्यालय नी सहभाग घेतला होता.

या विभागीय स्पर्धेत उत्कर्ष नवीन उनरकर 14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त केले, रुद्र निलेश येवतकर 14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त केले,यश कैलास बागडे 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सातारा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय जीत कुने डो स्पर्धेकरिता निवड झाली तर मोहित सुरेश इंगळे याने खेळाचे चांगले प्रदर्शन करीत द्वितीय स्थान प्राप्त केले.

विजयी स्पर्धकांचे अंत्योदय मिशन देवग्राम या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब भोगे , अध्यक्ष डॉ. भास्कर विघे, प्राचार्य देवेंद्र भोंगाडे, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रामभाऊ बोन्द्रे, जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रविकांत बाविस्कर , डॉ. योगेश सरोदे, अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष मंगेश निंबुरकर यांनी अभिनंदन व कौतुक केले. विजयी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील , प्रशिक्षक नरेंद्र बिहार, विदर्भ प्रमुख किरण यादव यांना दिले. सर्व खेळाडू प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी देवग्राम येथे सराव करतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: