नरखेड – नागपूर येथे पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत Qwan ki do या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळा करीता जीवन विकास प्राथमिक शाळा देवग्राम ता.नरखेड जि.नागपूर येथील वर्ग 4 थी मध्ये शिकणारा विद्यार्थी ओम राजेंद्र चवडे याने 8 ते 10 वर्ष वयोगट मध्ये 40 की.ग्र. वजन गटात रजत पदक प्राप्त केले.
त्याच्या या यशाबद्दल अंत्योदय मिशन देवग्राम या संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे, अध्यक्ष डॉ.भास्कर विघे, जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे, जीवन विकास प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक श्री.रविकांत बाविस्कर , जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रामभाऊ बोन्द्रे, अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष श्री.मंगेश निबुरकर, तसेच प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांनी अभिनंदन व कौतुक केले. विजयी खेळाडू अंत्योदय स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये नियमित सराव करतो. या खेळाडू ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व प्रशिक्षक नरेंद्र बिहार यांना दिले.