आकोट – संजय आठवले
व्यक्ती विकास संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेसीआय आकोटच्या वतीने जेसी सप्ताह अंतर्गत समाजात दुर्लक्षित असलेल्या किन्नरांचा बहुमान वाढावा व समाजाने त्यांना आपल्यासारखेच स्वीकारावे या उदात्ते हेतूने प्रेरित होऊन किन्नर फॅशन व टॅलेंट शोचे आयोजन केले होते.
या शो करिता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 33 किन्नर सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या कलांचे सादरीकरण करून आकोटवासियांना मंत्र मुग्ध केले. याप्रसंगी मंचावर मुख्य अतिथी म्हणून पुरुषोत्तम चौखंडे, विशेष अतिथी ठाणेदार प्रकाश अहिरे, किन्नर रचना अम्मा , पूर्वाध्यक्ष बिपिन टावरी,अध्यक्ष अतुल भिरडे ,पूर्वाध्यक्ष नितीन शेगोकार, सप्ताह प्रमुख विकास चावडा, प्रकल्प प्रमुख विवेक गणोरकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील मुख्य मार्गावरून किन्नरांची सायकल रिक्षामध्ये बसून रॅली काढण्यात आली. तेव्हा शहरवासीयांनी त्यांचे स्वागत करून जेसीआयच्या या अनोख्या प्रकल्पाचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वाध्यक्ष गोपाल गांधी, पूर्वाध्यक्ष प्रशांत खोडके यांनी केले तर आभार सचिव शिरीष घाटोळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व पूर्वाध्यक्ष तथा प्रसाद देशपांडे,अभिषेक दुबे, प्रशांत पिंपळे, अजय अडोकार,निलेश इंगळे, संदीप चांडक ,विनोद कडू,, रुद्रम झाडे, भारत वासे, किशोर लहाने, प्रवीण बनसोड , डॉ अक्षय बोरोडे, संदीप चांडक , हेमंत गणगणे, भरत कोथडकर, विजय नवले,भारत वासे, राजेंद्र मु्ऱ्हेकार, हरी सेजपाल, अमर राठी ,अमित ठाकूर, यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.