नाशिक – जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव तालुका दिंडोरी येथे दिनांक. १५/०७/२०२३ रोजी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम मोठया उत्सवात साजरा केला. विद्यालयाच्या १९९५ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पाल्मची २०० रोपे विद्यालय सुशोभित करण्यासाठी दिली.
प्रथम विद्यालयाच्या प्रार्थना सभागृहात सी. प्रेमलता देवरे माजी वरिष्ठ व्याख्याता व माजी भूतपूर्व प्राचार्य श्री. संजय लोडम या पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. यानंतर वृक्ष दिंडी शाळेच्या प्रांगणात ढोल ताशांच्या गजरात, प्राचार्य, शिक्षक वृंद आणि माजी विद्यार्थी देव जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव येथील विद्यार्थी सहभागी झाले प्रमुख पाहुणे, विद्यालयाचे प्राचार्य व माजी विद्यार्थी द्वारा वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर शिक्षक व विद्यार्थ्याद्वारे शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद पुणे येथील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री गणेश ढेरे एमआयटी ए डी टी पुणे विद्यापीठाचे मेकॅनिकल विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर संदीप थोरात यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
वृक्षारोपण कार्यक्रमात अनेक विविध क्षेत्रातील उच्च पदावर पोहोचलेले माजी विद्यार्थी देखील हजर होते. वृक्षारोपण कार्यक्रमाचे वरिष्ठ शिक्षक श्री. राजेंद्र वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यालयाचे प्राचार्या यांनी पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश दिला. सूत्र संचालन श्री. मेघराज देवरे उपायुक्त मुंबई (वस्तू आणि सेवा कर) यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. सोमनाथ पागे उपायुक्त मुंबई (वस्तू आणि सेवा कर) यांनी केले.