Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यबुलढाण्याच्या महामोर्चात "जरांगे पाटलांचे कुटुंबीय" सहभागी होणार..?

बुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार..?

बुलडाणा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांचे उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगे पाटील हे नाव घुमत आहे.

त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बुलढाणा येथील क्रांती मोर्चात बोलवण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले असून राज्याचे आकर्षण असलेले हे कुटुंब बुलढाण्याच्या मराठा क्रांती मोर्चा सहभागी झाल्यास या मोर्चाची उंची अर्थातच वाढणार आहे.

प्राप्त माहितीनुसार जरांगे पाटील यांची मुलगी मोर्चात संबोधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

*मनोज जरांगे पाटील हे नाव आज राज्यापासून केंद्र पर्यंत परिचित झाले आहे. जालना जिल्ह्यातील ह्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे. त्यांचे उपोषण दडपण्यासाठी पोलिसांनी जालना येथे लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले.

अमानुषपणे झालेल्या हल्यामुळे महाराष्ट्रामध्ये असंतोष धुमसत आहे. आरक्षणाची मागणी व या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा येथे मराठा क्रांती मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रांती मोरच्यात जरांगे पाटीलांचे कुटुंब सदस्यांना बोलविण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: