Japan Earthquakes : जपानमध्ये नवीन वर्षाच्या दिवशीच भूकंपाच्या धक्क्यांमुळे 24 लोकांचा मृत्यू झाला. भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी आगीही लागल्या आहेत. सोमवारी जपानमध्ये एकापाठोपाठ एक असे 155 भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप मूल्यांकन सुरू आहे. यासोबतच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये भूकंपानंतर खराब झालेले रस्ते आणि मेट्रो स्टेशनची स्थिती दाखवण्यात आली आहे.
भूकंपाचे धक्के व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये भूकंपापासून वाचण्यासाठी लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत. रस्त्यांना खड्डे पडल्याने नागरिक सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की मेट्रो स्टेशनही हादरले.
155 भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा
जपानमध्ये, तीनपेक्षा जास्त तीव्रतेचे 153 भूकंप मोजले गेले आहेत. या दोन धक्क्यांची तीव्रता 7.6 आणि 6 इतकी होती. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या इमारती कोसळल्या. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने म्हटले आहे की होन्शुच्या मुख्य बेटावरील इशिकावा प्रांतात झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी होती. त्याचवेळी जपानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इशिकावा येथील भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी होती. जपानच्या हवामान संस्थेने 155 भूकंपानंतर सुनामीचा इशारा दिला आहे.
WATCH: New shocking footage emerged of the time when massive 7.5 magnitude earthquake rattled Japan #Japan #Earthquake #JapanEarthquake pic.twitter.com/wM9EGmQUJ2
— Hoplite (@imhoplite) January 2, 2024
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की त्यांचे प्रशासन जपानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि जपानी लोकांना आवश्यक ती मदत देण्यासाठी तयार आहे. उंच लाटांच्या शक्यतेमुळे किनारपट्टी भागातील रहिवाशांना त्यांच्या घरी परतण्यास मनाई करण्यात आली आहे. देशभरातून हजारो लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस अधिकारी नुकसानग्रस्त भागात पाठवण्यात आले आहेत. धावपट्टीला तडे गेल्याने विमानतळ बंद करण्यात आले आहे.
Minor Earthquake in Japan 😟 pic.twitter.com/Oot7Qqe7Hi
— Out of Context Human Race (parody) (@NoContextHuman_) January 2, 2024