गणेश तळेकर
हर्षदा संजय बोरकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. त्यांच्यासह शुभांगी भुजबळ, अमृता मोडक व कविता जोशी यांच्याही भूमिका नाटकात आहेत.
‘स्वेवन स्टुडिओज’ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. सचिन गावकर यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. नाटकाचे सूत्रधार सुरेश भोसले आहेत. संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा यांच्या अभंगरचना; हर्षदा संजय बोरकर यांची गीतरचना; कविता जोशी, मंदार देशपांडे, शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांचे पार्श्वगायन या नाटकाला लाभले आहे.
या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे. या प्रयोगानंतर १० फेब्रुवारीला आचार्य अत्रे रंगमंदिर (कल्याण), ११ फेब्रुवारीला बालगंधर्व नाट्यगृह (पुणे), २५ फेब्रुवारीला कालिदास नाट्यगृह (नाशिक) व २६ फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह (ठाणे) येथे या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.