जालना येथील स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरच्या जागेवर आयकर विभागाने छापे टाकले. या कालावधीत, सुमारे 100 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये 56 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने, मोती-हिरे आणि मालमत्तेची कागदपत्रे यांचा समावेश आहे.
याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या रोकड मोजण्यासाठी 13 तास लागले.
250 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला
या कारवाईसाठी अडीचशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आयकर विभागाने आपल्या टीमची पाच वेगवेगळ्या भागात विभागणी केली होती आणि छाप्यासाठी 100 हून अधिक वाहनांचा वापर केला होता. कापड व स्टील व्यापाऱ्याच्या घरातून सापडलेली रोकड जालना येथील स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन मोजण्यात आली. बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून रोकड मोजणीला सुरुवात झाली असून रात्री एक वाजेच्या सुमारास रोख मोजणीचे काम पूर्ण झाले.