Monday, December 23, 2024
Homeराजकीयविशालगडावर सामाजिक सलोखा बिघडणाऱ्यावर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख यांची...

विशालगडावर सामाजिक सलोखा बिघडणाऱ्यावर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे.

कोल्हापूर जिल्हा तालुका शाहूवाडी विशाळगड येथे काही समाजकंटक विशाल गडावरील हजरत मलिक रेहान दर्ग्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला याची चौकशी होऊन संबंधित समाजकंटकावर सामाजिक सलोखा बिघडवणे,शांतता बिघडवणे व हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा निर्माण करणारे असे कृत्य केलेले आहे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून माननीय मुख्यमंत्री यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत तसेच विशालगडावर शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोण करतोय? याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

भविष्यामध्ये अशा असामाजिक घटना घडणार नाही याच्याही गांभीर्याने विचार व्हावा.अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली मीरजेचे प्रांत समीर शिंगटे साहेब यांच्याशी विशालगड येथे झालेल्या प्रकाराबद्दल सविस्तर चर्चा करून. मिरज प्रांत साहेब मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख,शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी,ब्ल्यू पॅंथरचे प्रवक्ते गणेश कांबळे, जमीर शेख,साद गवंडी व नासिर शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: