सांगली – ज्योती मोरे.
मुस्लिम व ख्रिश्चन समाजासाठी महापालिकेने अधिग्रहण केलेले सांगली येथील शामराव नगर मधील जमीन सिटी सर्वे नंबर 507 ही जमीन आरक्षित असल्याने महापालिकेने दफनभूमीचे फलक लावून ख्रिश्चन व मुस्लिम समाजाला बहाल करावे व होणाऱ्या वाद विवादावर पडदा टाकावा.
अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांनी महापालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांना निवेदन देऊन व मिरजेचे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे यावेळी शिवसेना गुंठेवारी समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी,शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश लाड,आरपीआयचे संभाजी साबळे,जयसिंग साळुंखे सामाजिक कार्यकर्ते नासिर शेख व साद गवंडी उपस्थित होते.