सांगली – ज्योती मोरे
धामणीला स्वतंत्र जंक्शन करून मिरजेच्या महत्त्व कमी करणाऱ्या प्रयत्नाचा जाहीर निषेध.पुरामुळे बाधित होणाऱ्या खेडेगावात जंक्शन करून काय साध्य होणार?असा सवाल ही उपस्थित केला.महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे तालुक्याचे शहर असून ते कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांना जोडणारे महत्त्वाचे शहर आहे ब्रिटिश काळापासून मिरज शहराला नॅरोगेज,मीटरगेज व ब्रॉडगे या तिन्ही सुविधा असलेले भारतातील मोजक्या जंक्शन पैकी एक जंक्शन मिरज होते व आहे.
शहराला ऐतिहासिक असा वारसा असून मिरज शहराला आरोग्य पंढरी म्हणून अख्या भारतामध्ये नावलौकिक आहे. मिरज शहर हे संपूर्ण भारतात तंतुवाद्य निर्मितीचे प्रमुख केंद्र असून मिरज शहरातील तंतुवादी हे देश विदेशात नावाजलेले आहे. अशा मिरज शहरात मिरज रेल्वे जंक्शनची सुविधाही वरील मिरज मिरज शहराचे महत्त्व ओळखून पूर्वीच्या राजकर्त्यांनी केली होती.
असे असताना मिरज शहरातील मिरजेपासून केवळ पाच ते सहा किमी अंतरावर असलेले धामणी हे खेडेगाव असून तेथे कोणत्याही नागरिक सुविधा उपलब्ध नाहीत तसेच धामनी हे खेडेगाव आविकसित असून त्याला वारंवार पावसामुळे पुराच्या फटका बसत असून संपूर्ण गावाला पुराचा पाण्याचा वेढा असतो म्हणजे ते खेडेगाव पाण्याखाली असते ही अशी वस्तूस्थिती असताना केन्द्र सरकारमधील रेल्वे भागातील उच्च अधिकार्यापासून कर्मचाऱ्यांना याची कल्पना आहे का नाही?
रेल्वे अधिकारी हे रेल्वेचा पगार घेऊन काय काम करत आहेत? असा सवाल मिरजकर जनतेस पडला आहे धामणी मध्ये नवे रेल्वे जंक्शन उभारणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार होईल.तरी रेल मंत्रालयाने धामणीला जंक्शन न करता. मिरजेला स्वतंत्र डिव्हिजन करावे.मिरजेचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याने क्वाड लाईन मिरज जंक्शन मार्गे घेऊन जाण्यात यावे.स्वतंत्र रेल्वे मंडल ची स्थापना व्हावी त्यामुळे मिरज जंक्शनातून अधिक रेल्वे गाड्या सोडण्यास व प्रवाशांना सुख सुविधा देणे सोयीस्कर होईल.
तसेच रेल्वे बदलण्यासाठी वीस मिनिट लागतात म्हणून प्रशासन सांगत आहे.. ही बाब काही नवीन नाही हे पूर्वीपासून असेच होत आहे.याचा कुणालाही त्रास नाही मिरज रेल्वे जंक्शन हे ब्रिटिशकालीन असून याचे महत्त्व आबादित राखावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येईल या प्रकारचे निवेदन मिरजेचे रेल्वे स्टेशनचे सुप्रिडेंत बी भगत साहेब यांच्यामार्फत भारताचे प्रधानमंत्री व भारताचे रेल मंत्री व महाराष्ट्रचे राज्य रेल्वेमंत्री यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख, शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक निरक्षर अध्यक्ष अरबाज कुरणे, जमीर शेख,पापा पठाण,फैज काजी,नासिर शेख,साद गवंडी शब्बीर काजी आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते