एएसपी अशोक थोरात यांच्या हस्ते उद्घाटन…
खामगाव, (हेमंत जाधव) : संपूर्ण राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. खामगाव येथील चांदमारी भागातील जय भवानी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीगणेश उत्सवा निमित्त थोर महापुरुषांची सजीव मानवी प्रतिकुर्ती तयार करुण समाज प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्याचे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांच्या हस्ते 11 सप्टेंंबर रोजी उद्घाटन करण्यात आले.
जय भवानी गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम, देखावे, नाटिका सादर करत असते. यावर्षी मंडळाकडून जगातील सध्याच्या परीस्थितीवर भाष्य, थोर महापुरुषांचा विचारांचा जागर यावर आधारित समाज प्रबोधनात्मक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यात सजीव मानवी प्रतिकृती तयार करुन समाजप्रबोधन केले जात आहे. महापुरुषांच्या वेषातील भूमिका, मौलिक विचार, देखाव्यातील संवाद सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या देखाव्याला 11 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून एएसपी अशोक थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे , शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजू पवार, नगरसेविका सौ. शितलताई माळवंदे, बजरंग दलाचे अमोल अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर मान्यवराचा मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आखाडा प्रमुख प्रितम माळवंदे, कावड यात्रेचे अध्यक्ष पवन माळवंदे, सतिष गवळी, रमेश अवचार, हरी गायकवाड, शिवाजी झरेकर, डेकोरेशन समितीचे अध्यक्ष दत्ता सरोदे, वानखडे सर, सौ प्रिती पवार गणेशोत्सव समिती अध्यक्ष पवन गवळी, उपाध्यक्ष जय मोरे, सचिव सुरज लोंढे, सहसचिव आशिष घुमरे, कोष्यध्यक्ष ऋषिकेश तासतोडे, सहकोष्यध्यक्ष करण त्रिभुवन, सदस्य आशिष कांबळे, राहूल काकडे, हरी गायकवाड, पंकज पुरी, जग्गू गुजर,भुषण पाथरे, शिवम कांबळे, रोहिदास मस्तुद, संतोष बोरकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते