मुंबई – गणेश तळेकर
रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल आयोजित रोटरी सप्ताह अंतर्गत युवा महोत्सवाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रोटरी चषक 2023 मॅटवरील “अ” गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि ०७/१२/२०२३ ते १०/१२/२०२३ या कालावधीत स्व. काशिनाथ कृष्णा पाटील क्रीडानगरी, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, काल्हेर येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. त्यात चार दिवसात १५ सामने खेळविण्यात आले. उजाला वळ व जय बजरंग वासिंद यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. या अटीतटीच्या लढतीत जय बजरंग वासिंद विजेता तर उजाला वळ हा संघ उपविजेता ठरला. यावेळी होतकरू मित्र मंडळ ठाणे व ओम क्रीडा मंडळ ठाणे असा महिलांचा प्रदर्शणीय सामना सुध्दा खेळविण्यात आला.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे DG रो. मिलिंद कुलकर्णी, SW chief रो. सर्जेराव सावंत, रो. देवराम घागरे , PDG संदीप कदम, PDG ॲशेष गांगुली , DGE दिनेश मेहता, CCL Chief प्रीतपाल सिंग, रो. डॅा निलेश जयवंत,रो. CM बेंद्रे, रो. संदिप साळवी, रो. मनोज ठाकूर, रो. संग्राम जोशी,रो. सतिष भोजने, रो. विकास जाधव, रो. सदानंद भोईर यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली.
तर राजकीय क्षेत्रातील केंद्रिय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा म. प्र. देवेश पाटील, भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष मधुकर जी मोहपे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास थळे, कृष्णकांत कोंडलेकर, वसंत भोईर, कुंदन पाटील, सरपंच रेखा विनोद मुकादम, गोपाळ पाटील, राजू अनंत पाटील, विकास इताडकर, चंद्रकांत शांताराम म्हात्रे अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. सदर स्पर्धेला सतत ४ दिवस प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धेसाठी जी पी पारसिक सहकारी बॅंकेचे सहप्रायोजकत्व होते.
प्रेसिडेंट भानुदास पाटील व सेक्रेटरी संदेश भोईर यांच्या नेतृत्वात व डिस्ट्रिक सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे व चार्टर प्रेसिडेंट हरिश्चंद्र भोईर यांच्या मार्गदर्शनात रो. प्रमोद भोकरे, रो. द्वारकानाथ म्हात्रे यांच्यासह 48 रोटरीयन यांनी स्पर्धा यशस्वी केली.