Sunday, November 17, 2024
HomeAutoआयवूमी एनर्जीची इलेक्ट्रिक स्कुटर्सवर उत्सवी सवलत...

आयवूमी एनर्जीची इलेक्ट्रिक स्कुटर्सवर उत्सवी सवलत…

आयवूमी एनर्जीने आपल्या इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या श्रेणीवर यंदाच्या सणासुदीच्या काळात विशेष सवलती सुरु केल्या आहेत. आयवूमी ‘बिग एनर्जी फेस्ट’ मध्ये अनेक विशेष लाभ देण्यात येत आहेत, यामध्ये सर्व हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कुटर्सवर ४००० रुपयांचे डिस्काऊंट्स तसेच ५००० रुपयांच्या भेटवस्तू व ऍक्सेसरीज यांचा समावेश आहे. याशिवाय आयवूमीने जीतएक्स लिमिटेड एडिशन स्कुटर देखील सादर केली आहे जी १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

जीतएक्स लिमिटेड एडिशन इलेक्ट्रिक स्कुटर्सची किंमत १,०२,००० रुपये असून एका नव्या अवतारामध्ये फक्त ९८,००० रुपये किमतीला या स्कुटर्स ग्राहकांना १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत खरेदी करता येतील. रेड हायलाईट्ससह ग्लॉसी ब्लॅक, ब्ल्यू हायलाईट्ससह ग्लॉसी ब्लॅक, रेड हायलाईट्ससह मॅट व्हाईट आणि ऑरेंज हायलाईट्ससह मॅट व्हाईट असे पर्याय लिमिटेड एडिशनमध्ये उपलब्ध आहेत. तर जीतएक्सची किंमत ९५,९९९ रुपये आहे.

गाडी चालवताना अतिरिक्त आरामासाठी आयवूमी सिग्नेचर बकेट सीट्स जीतएक्समध्ये दिल्या जात आहेत. बकेट स्टाईल कम्फर्ट सीटमध्ये युनिक फॉर्म फॅक्टर आणि कम्फर्ट यांचा मिलाप घडवण्यात आला आहे. या सीट्स अनोख्या असून एर्गोनॉमिक पोश्चर कायम राखण्यात त्यामुळे मदत मिळते.आयवूमी एस१ नव्या अवतारामध्ये उपलब्ध करवून दिली जाणार असून त्यामध्ये पिकॉक ब्ल्यू, नाईट मरून, डस्की ब्लॅक हे पर्याय आहेत व तिची किंमत ९५,९९९ रुपये आहे.

आयवूमी एनर्जीचे सीईओ आणि सह-संस्थापक श्री. अश्विन भंडारी यांनी सांगितले, “बिग एनर्जी फेस्ट सादर करून आमच्या संपूर्ण परिवारामध्ये आनंद पसरवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि शाश्वत भवितव्याकडे भारताला घेऊन जाण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

भारतातील वाहन चालवण्याच्या पद्धती आणि परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या स्कुटर्स डिझाईन करण्यात आल्या आहेत. आमच्या मोबिलिटी सेवासुविधा आणि उत्पादनांमार्फत लोकांमधील अंतर दूर करून सर्वत्र आनंद पसरवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

सर्व आयवूमी डीलरशिप्समध्ये हे विशेष लाभ उपलब्ध आहेत. ग्राहकांना वाहनकर्ज सहजपणे मिळवता यावे यासाठी आयवूमीने अनेक आर्थिक साहाय्य सुविधा पुरवल्या आहेत, दरवर्षी ७% इतका कमी व्याजदर, शून्य डाऊन पेमेंट यांसह इलेक्ट्रिक दुचाकींच्या ऑन-रोड किमतीवर १००% पर्यंत कर्जसुविधा यांचा त्यामध्ये समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: