रामटेक – राजु कापसे
इतवारा-रामटेक लोकलचे भाड़े तीन गुना जास्त आहे। परंतु महिन्यातुन 20 दिवस लोकलचा उशिरा फेऱ्या मुळे प्रवासी त्रस्त आहेत। इतवारा-रामटेक लोकलच्या कोरोनाच्या काळात किरायात वाढलेली 30 रुपयांच्या तिकीट दरात अजुन कमी झालेली नाही. कोरोना काळ पूर्वी रामटेक-इतवारा लोकल ट्रेनसाठी 10 रुपये किराया तिकीट होते. 10 रुपयांत जाने आणि 10 रुपयांत येने असे प्रवाशाना 20 रुपये तिकीट द्यावे लागत होते.
कोरानाच्या वेळी स्पेशल ट्रेन करून तिप्पट म्हणजे 30 रुपये टिकिट करण्यात आले। कोरोना संपल्यानंतरही 30 रुपयांचे तिकीट सुरूच आहे. या लोकल ने मोठ्या संख्येने मजूर, व्यापारी, विद्यार्थी नागूरला येणे जाने करतात. परिसरातील अनेक गावातील मजूर मजुरीसाठी नागपुरात जातात. मात्र आता जाण्यासाठी 30 रुपये आणि येण्यासाठी 30 रुपये असल्याने व रामटेक ते रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी ऑटोचे 30 रुपये असे ऐकून 90 रुपये मोजावे लागतात. मजूर आणि इतर लोकाना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
दुसरीकडे, नागपूर इतवारा ते रामटेक सुटण्याची वेळ पहाटे 5.35 आहे. रामटेक येथे पोहोचण्याची वेळ 6.55 आहे आणि लोकल सुटण्याची वेळ 7.35 आहे. नागपूर येथे पोहचन्याची वेळ 08:45 आहे. पण तीही वेळेवर पोहोचत नाही. वेळ जास्त झाला की कामगार कामावर जाऊ शकत नाहीत. कितेक वर्ष्या पासून चालनारी दुपारची ट्रेन आता बंद आहे. संध्याकाळी इतवारा ते रामटेक सुटण्याची वेळ 7.10 आहे। रामटेकला पोहचन्याची वेळ रात्रि 8.25 वाजता आणि रामटेकहून सुटण्याची वेळ रात्री 9.30 वाजताची आहे.
मात्र डुमरी व कलमना स्टेशन वर इतर ट्रेन जान्याकरिता रामटेक लोकलला थामबविले जाते। त्यामुळे उशिरा पोहोचते. मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रात्री उशीर होतो. रात्री 9.30 वाजता रामटेकहून सुटणारी गाडी इतवारा कधी पोहोचेल याचा कोणताही नेम नाही. प्रवाश्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेन महिन्यातून 20 दिवस उशिरा धावतात.
सकाळी रामटेकहून सुटणारी ट्रेन नागपूरला वेळेवर पोहोचत नाही, तर दुसरीकडे इतवाराहून रात्री येणारी ट्रेन वेळेवर येत नाही आणि वेळेवर पोहोचत नाही. रात्रीची जाण्याची वेळ उपयुक्त नाही. यामुळे प्रवाशी रामटेक ट्रेनला बाय बाय म्हणू लागले आहेत.
रामटेक लोकलला का उशीर होतो – या मार्गावरील मालगाड्या, एक्सप्रेस गाड्यांना मार्ग देताना इतवारी – रामटेक लोकल ठिकठिकाणी थांबवल्या जातात, विशेषकरुंन डुमरी व कलमना येथे जास्त थंबविली जाते. त्यामुळे 30 दिवसांपैकी 20 दिवस ट्रेन उशिराने धावतात. त्यामुळे प्रवासी व मजूर वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
30 रुपयांचे तिकीट असतानाही रेल्वेचे उत्पन्न निम्म्याहून अधिक घटले आहे. तिकीट 10 रुपये होते, तेव्हा जास्त उत्पन्न होते. विशेष करून कोरोना कालावधीत वाढलेला किराया रामटेक लोकल सोडून इतर कोणत्याही ट्रैन मधे नाही. जनता सवाल करीत आहे की रामटेक लोकल वरच का अतिरिक्त अधिभार लावला जातो.
रामटेक लोकल वर जनप्रतिनिधिचे लक्ष्य नाही – केंद्र सरकारचा अंतर्गत रेलवे विभाग येत असल्याने खासदार यांची जिम्मेदारी आहे की रामटेक लोकल वेळेवर धावली पाहिजे। कोरोना काळात वाढलेली टिकिट कमी झाली पाहिजे। परंतु त्यांचे अति दुर्लक्ष आहे असे प्रवाश्याचे म्हणणे आहे। रामटेक लोकसभा क्षेत्र मधे रेल्वेची चालनारी एकमेव रामटेक लोकल आहे। अशीच परिस्थिति राहिली तर केव्हाही बंद पडू शकते।