Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनप्रेक्षकांना पुन्हा घाबरवायची "सोय" झाली…अल्याड पल्याड २ येतोय…

प्रेक्षकांना पुन्हा घाबरवायची “सोय” झाली…अल्याड पल्याड २ येतोय…

अल्याड पल्याड टीमने मानलेमाध्यम प्रतिनिधींचे आभार

मुंबई – गणेश तळेकर

अल्याड पल्याड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या  चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्याआठवड्यातही सुरुच  ठेवली आहे. चित्रपटाचे यश साजरे करीत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष  सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी,तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्याअमूल्य सहकार्याची दखल घेत ‘अल्याड पल्याड’ टीमने उपस्थित माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देत सन्मान केला. 

या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला हीआमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे एस.एम. पीप्रोडक्शन्चे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले. 

रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते शैलेश जैन,महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आता ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणारआहेत. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, असाविश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.

SMP Presentes

Producer: Shailesh Jain | Mahesh Nimbalkar
Director: Pritam SK Patil

AlyadPalyad2

A Filmastra Studio Release

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: