Friday, November 22, 2024
Homeराज्यशेतीच्या रस्त्याच्या वादातून पुतन्यानेच केली काकाची हत्या....कोथुळणा येथील घटना...

शेतीच्या रस्त्याच्या वादातून पुतन्यानेच केली काकाची हत्या….कोथुळणा येथील घटना…

रामटेक – राजु कापसे

सावनेर तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत कोथुळणा येथे गुरुवार (ता.14/03/2024) ला अकरा वाजताच्या सुमारास शेताच्या रस्त्याच्या वादातुन पुतण्यानेच काकाची हत्या केल्याची घटना घडली. मृतक पुरूषोत्तम लांबट (वय 51 वर्ष) तर आरोपी संदीप लक्ष्यम लांबट ( वय २८) दोघेही कोथुळणा येथील रहिवासी आहे.

कोथुळणा येथील आरोपी संदीप लक्ष्मण लांबट व मृतक काका पुरुषोत्तम लांबट यांचा एक वर्षापासून रस्त्यासाठी वाद सुरू होता. या अगोदर सुद्धा काका पुतण्यात वाद विवाद झाले.नुकतेच एकदोन दिवसापासुन शेताच्या रस्त्यावरून पुन्हा वाद सुरू होता.

आरोपी संदीप लांबट याला मृतक पुरुषोत्तम स्वतःच्या शेतातुन जाण्याचा रस्ता नसल्यामुळे तो आपल्या शेतातुन जाऊ देत नव्हता. नेहमीच आरोपीला अडवीत होता.गुरूवार ला हा वाद विकोपाला गेला काका पुतण्यात कडाक्याचे भांडण झाले.आणि हा वाद विकोपाला गेला.

संतापाच्या भरात संदीपने काकावर कुराडीने सपासप वार केले. कुराडीच्या घावाने पुरुषोत्तम हा रक्त रंभाळ होऊन खाली कोसळला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातील लोकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती खापा पोलिसांना कळताच खापा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रक्त बंभाळ झालेल्या पुरुषोत्तम ला सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे प्राथमिक उपचाराकरिता नेण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासुन त्याला मृत्यू घोषित केले.

फिर्यादी मुलगा आदित्य लांबट यांच्या बयानावरून गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक शरद भस्मे ( प्रभारी ठाणेदार) यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद गेडाम, गणेश भगनुरे ,पन्ना बटाउवाले करीत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: