पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील आलेगाव येथे पायी चालून शरीराला कष्ट देऊन आपण दोड्रा ते माना पदयात्रे दरम्यान परमेश्वराचे स्थान दर्शन करीत आहा हे कष्ट फळास येऊन सर्व पद यात्रेकरूंना देव भेटो आणि तुमचे कष्ट दूर होओ तसेच पदयात्रेमध्ये चालून स्थान दर्शन म्हणजे अहोभाग्यच म्हणावे लागेल,
पेमेश्वर ज्ञानाने अनेक जीव मार्गात जोडले जातात, सतत परमेश्वराचे चिंतन मनात राहिले तर तो भक्त सतत सत्कर्म करीत राहतो आणि त्याला परमेश्वर भेटीची ओढ लागून संन्यास विधिकडे ओढून परमेश्वर प्राप्तीस पात्र ठरू शकतो.
तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आलेगावामध्ये भक्तजना सोबत ८०० वर्षापूर्वी तीन चार वेळेस येऊन भाग्यवान जीवा कडून आरोगना केली आणि एक दिवस मुक्काम करून पुढील मार्गी रवाना झाले.त्यामुळे हे गाव खूप भाग्यवान आहे असे प्रबोधन करून पदयात्रे मध्ये सामील मंडळींना कोणत्या वस्तूंची जरुरत असेल ती वस्तू उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच यात्रेकरू आजारी असेल तर त्यांच्या करीता मेडीसिन उपलब्ध आहे.
गरज भासल्यास डॉ उपलब्ध करून उपचार करू असे आवाहन संग सांगात सेवा मंडळ परभणी द्वारा आयोजित तीर्थस्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन स्थान दर्शन करीत पद् यात्रे करू दि.२रोजी आलेगाव येथील श्रीकृष्ण आश्रम येथे आले असता श्रीकृष्ण आश्रमच्या संचालिका प.पू.त.मोठ्या आक्काजी यांनी पदयात्रेकरूंना मार्गदर्शन पर संबोधन केले.
या वेळी पदयात्रेमध्ये सामील प.पू.प.म.श्री दत्तराज दादा भोजने,मनोहरदास मचाले, महैंद्रमुनी कपाटे, गुंजटकर बाबा कोठी, मोतीबाबा अमृते,सायराजबाबा कपाटे आणि भिक्षुक मंडळी यांची विधिपूर्वक पूजा करून भोजन देण्यात आले. तसेच वासनिक आणि उपदेशी महिला आणि पुरुष मंडळीना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.पदयात्रेमुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.गावातील उपदेशी महिला पुरुष मंडळींनी पदयात्रेकरुंचे सेवाकार्य केले.