Monday, November 25, 2024
Homeराजकीयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच दलित आणि महिलांना मताचा अधिकार - आमदार सुधीर गाडगीळ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच दलित आणि महिलांना मताचा अधिकार – आमदार सुधीर गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ब्रिटनमध्ये कर भरणारे आणि सरंजामदांर वर्गालाच मताचा अधिकार होता हीच पद्धत इंग्रजांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात भारतात लागू केली होती पण संविधानांचे लिखाण करताना देशातील सर्व प्रौढ नागरिकांना मतांचा अधिकार दिला पाहिजे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती.

स्त्रिया आणि दलितांना राज्यकारभार काय असतो हे माहीत नसते त्यामुळे त्यांना मतांचा अधिकार कशाला अशी काही सदस्यांची भूमिका होती पण डॉ. आंबेडकरांनी सर्वांना मताधिकार दिला तरच स्वातंत्र्य, समता, बंधुता हे मानवतेचे तत्व प्रतीक्षात उतरेल हे घटना समितीच्या सदस्यांना पटवून दिले आपल्या सर्वांना मताधिकार मिळाला आहे तो डॉ. आंबेडकरांमुळेच हे प्रत्येक नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रकाशतात्या बिर्जे, श्रीकांततात्या शिंदे, मुन्नाभाई कुरणे, अविनाश मोहिते, मोहनबापू जाधव, शहानवाज सौदागर, वैशाली पाटील, उदय मुळे, गौस पठाण, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे, सुभाष गडदे, भालचंद्र साठे, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: