ISRO INSAT-3DS : ISRO ने शनिवारी INSAT-3DS या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हा आधुनिक हवामान उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा बेटावरून प्रक्षेपित करण्यात आला आहे. हे भूकंप, वादळ, पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी माहिती देईल आणि धोक्याच्या वेळी ताबडतोब अलर्ट जारी करेल.
GSLV 20 मिनिटांत उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पोहचणार
INSAT-3DS हे GSLV F14 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले जाईल. GSLV F14 चे हे 16 वे मिशन असेल. GSLV F14 अवघ्या 20 मिनिटांत उपग्रहाला त्याच्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, या उपग्रहावरून हवामान आपत्कालीन परिस्थितीची माहिती वेळेत मिळणार आहे. त्यामुळे बचावकार्य वेळेत सुरू होण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते, वेळीच माहिती मिळाल्यास जीवित आणि मालमत्तेची हानी कमी होऊ शकते. GSLV-F14 रॉकेटद्वारे सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड 2 वरून हा उपग्रह सोडण्यात आला.
भारतीय हवामान संस्थांसाठी उपग्रह महत्त्वपूर्ण ठरेल
इनसॅट-3डीएस उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येईल. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.