Sunday, December 22, 2024
HomeMarathi News TodayIsrael Palestine War | हमास सैनिकांचा क्रूरतेचा कळस...पिंजऱ्यात लहान मुलांना डांबले...

Israel Palestine War | हमास सैनिकांचा क्रूरतेचा कळस…पिंजऱ्यात लहान मुलांना डांबले…

Israel Palestine War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान, अनेक भयानक व्हिडिओ समोर आले आहेत जे संपूर्ण जगाला हादरून सोडणारे आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हमासचे सैनिकांनी इस्रायलच्या लहान मुलांना एका पिंजऱ्यात डांबून ठेवले तर एका मुलीला तिच्या आई-वडील आणि भावांसमोर निर्घृणपणे ठार मारले आणि “जन्नत मध्ये गेला” असे म्हणत आनंदोत्सवात घोषणाबाजीही केली.

हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका इस्रायली मुलीची हत्या होत असताना तिचे दोन लहान भाऊ भीतीने किंचाळत आहेत आणि तिच्या आई-वडिलांचे हमासच्या सैनिकांकडून तुकडे-तुकडे केले जात असल्याचे दिसत आहे. हे घडताना पाहून वेदना होत आहेत.

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, गाझा मध्ये नेवून ठेवलेल्या लहान मुलांना पिंजऱ्यात डांबून ठेवले त्यानंतर ओलीस ठेवलेला बालकांवर हसत आहेत, आनंद साजरा करत आहे. येथे हल्लेखोरांचा क्रूरपणा पाहून सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच हृदय हेलावले आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान पोप फ्रान्सिस यांनी शांततेचे आवाहन केले आहे आणि म्हटले आहे की “दहशतवाद आणि युद्ध कोणतेही समाधान देत नाहीत.”

हिंसाचाराचा व्हिडिओ सोशल मिडिया X वर आहेत. मात्र येथे गूगलच्या पॉलिसीमुळे टाकू शकत नाही.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: