राजुरा विधानसभेत देवराव भोंगडे यांची 61 लाखाची रोकड जप्त…
चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
भाजपचे उमेदवार पैशाचे आमिष देऊन आपल्या विजयाचे गणित आखत असल्याची चर्चा सर्वदूर सुरु असतांनाच राजुरा विधान सभेतील भाजप चे अधिकृत उमेदवार देवराव भोंगडे हे मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते विकत घेणार असल्याची तक्रार निवडणूक विभागाला प्राप्त झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकून 61 लाख रुपयांची नगदी रोकड जप्त केली आहे.
चिमूर विधानसभेत भाजप उमेदवार बंटी भांगडिया विधानसभा क्षेत्रात पैसे वाटप होण्याच्या आरोप सोशल मीडिया वरून वायरल झाल्यावर भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यात राडा झाला होता… आता पुन्हा राजुरा विधानसभा क्षेत्रातील उमेदवार देवराव भोंगळे आता 61 लाख रुपये प्रकरणी अडचणीत सापडले आहे.
तर मूल तालुल्यात कोसंबी येथील एका गावात बल्लारपूर विधानसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आचारसंहिंतेला फाटा घेत प्रचार बंद झाल्यावरही सभा घेतल्याने काँग्रेस- भाजप मद्ये राडा झाला होता.मुनगंटीवार यांनी मते मिळविण्यासाठी पैशाचे वाटप करण्यासाठीच नियमबाह्य सभा घेतल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
एकंदरीत चिमूर,बल्लारपूर,राजुरा विधानसभेत भाजप उमेदवारांना पराभवाची मोठी भीती सतावत असल्याने ते थेट मतदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या विजयाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न करित असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे…एकंदरीत भाजप उमेदवारांच्या विजयाची मदार पैशावर अवलंबून आहे का..? असा प्रश्न उपस्थित होत असून,मतदार राजा कुणाची साथ देतो,हे लवकरच स्पष्ट होणार आहे.