भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त बोलण्याचा सपाटाच लावला असून भाजपचे नेते जाणूनबुजून महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात की काय? आजही भाजपा नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबाबत वादग्रस्त विधान केलंय.
तर या वादग्रस्त विधानावर राज्यातून मोठ्यप्रमाणावर तिखट प्रतिक्रिया येत असून या विधानावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “प्रसाद लाड यांचं विधान हे बेजबाबदार वक्तव्य आहे. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. शिवरायांचा वारंवार केला जाणारा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही”, असं संभाजीराजे म्हणालेत.
पुढे संभाजी राजे म्हणाले,प्रसाद लाड हा मुर्ख माणूस आहे. भाजपा महाराजांचा अपमान हा प्लान करून करतोय का? अवघ्या महाराष्ट्राची माफी मागा,
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.ते मुंबईतील कोकण महोत्सवात बोलत होते.