Saturday, December 21, 2024
Homeराजकीयराणा दाम्पत्यांना भाजप दूर ठेवत आहे?...

राणा दाम्पत्यांना भाजप दूर ठेवत आहे?…

राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा लागणार आहेत त्या आधीच सर्व पक्षांची विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. तर भाजप आणि महायुतीतील घटक पक्षही सज्ज झाले आहेत. काल महायुतीतील घटक पक्षांची अमरावती येथे बैठक झाली या बैठकीला सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते. मात्र रवी राणा व नवनीत राणा या दोघांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले नाही. राणा दांपत्य या बैठकीला दिसले नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर राणा दांपत्याला महायुतीतील काही घटक पक्ष विरोध करत आहे काय? किंवा राणा दांपत्याला जवळ केलं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची भीती महायुतीला आहे का? हे कालच्या बैठकीवरून निदर्शनास आले आहे.

मागील तीन-चार वर्षात राणा दाम्पत्य अवघ्या राज्यातच नव्हे तर देशातही आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाले होते तर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या ठाम निर्णयावर त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यामुळे ते आणखीन भाजपच्या जवळ गेले सोबतच देवेंद्र फडवणीस आणि राणा दांपत्याची जवळीक सर्वश्रुत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाल्याने भाजपचीच नव्हे तर राणादांपत्याचेही नाचक्की झाली. तर हरल्याचं दुःखही राणा दाम्पत्याला झालं नवनीत राणा कोणत्याही जाहीर सभा असो त्या रडल्याशिवाय सभा पूर्ण होत नाही. असे अनेकदा निदर्शने झाले मात्र होऊ घातलेल्या विधानसभेसाठी राणा दाम्पत्य भाजपकडून उमेदवारी मागण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघात उमेदवारी मागण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते आणि बडनेरा मतदार संघात भाजपचा पाठिंबा आपल्याला मिळावा असं रवी राणा यांना वाटते. या दांपत्याला जर भाजपकडून उमेदवारी मिळाली तर गेल्या कित्येक वर्षापासून भाजपमध्ये सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते वंचित राहू शकतात. तसाही राणा दांपत्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेचा कल नव्हे तर पदाधिकाऱ्यांचा कलही काय आहे हे माहित पडला. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत खुलेआम नवनीत राणांना विरोध केला अनेक पदाधिकारी प्रचारातून गायब दिसले.

भाजप आणि घटक पक्ष या दोन्हीकडून राणा दाम्पत्याला विरोध असल्याचे भाजपच्या वरिष्ठांना निदर्शनास आल्यामुळे भाजपने राणा दांपत्यापासून लांब राहणे सुरू केले का दुसरे कारण कारण म्हणजे काल परवा लाडकी बहिण विषयी केलेलं वक्तव्य भाजपच्या चांगलाच अंगलट आले असे दिसते. रवी राणा यांनी जरी मिस्कीलपणे म्हटले असेल तरी विरोधकांनी त्याचा मोठे राजकारण केले आहे. त्यामुळेच महायुतीची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी भाजप सावध भूमिका घेत आहे का?.

मागील निवडणुकीतील उद्धव ठाकरे विरोधात प्रचाराचा रान उठवणारे व एक प्रकारे भाजपची भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागणारे रवी राणा यांना त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपाने सध्या अमरावतीत होणाऱ्या अधिवेशनापासून दूर ठेवून एक प्रकारे सावध भूमिका स्वीकारली आहे मित्र पक्षांची अमरावतीत होत असलेला बैठकीत त्यांना आमंत्रण न देणे यावरूनच हे सिद्ध होतं की भारतीय जनता पक्षाची त्यांची गरज संपली आहे इतकेच नव्हे तर अमरावती शहरातील व जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना दुखावून रवी राणा यांना तिकीट देऊन पुरस्कृत करणे अशी चूक भाजप पुन्हा करणार नाही याची दाट शक्यता आहे याचा अंदाज रवी राणा यांना आला असावा कदाचित त्यामुळेच त्यांचे भान सुटून ते सातत्याने चुका करीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल स्पष्टपणे सांगितले की कोण मित्र पक्षातील कोणत्याही नेत्यांनी योजनेच्या संदर्भात वक्तव्य करू नयेत

रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष हा भाजपचा घटक पक्ष म्हणून त्याची सध्याची ओळख आहे मात्र कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांना डावलले असल्याने येणाऱ्या विधानसभेमध्ये राणा दापत्य भाजप सोबत असणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. राणा दाम्पत्याने भाजप साठी विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांसोबत पंगा घेतला, अंगावर केसेस ओढून घेतल्या मात्र त्यांना भाजप डावलनार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दाम्पत्याचे काय होईल?. हे पाहणे औत्सुक्याचे त्याचे ठरणार आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: