सांगली – ज्योती मोरे
वाहतुकीचे नियम हे सर्वांना माहीत आहेत, परंतु ते लोक पाळत नाहीत, ते पाळल्यास अँक्सीडेंटचे प्रमाण कमी व्हायला वेळ लागणार नाही. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे गाड्यांची संख्या कितीही असली तरी, एक्सीडेंट होणार नाहीत. असे मनोगत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी केले आहे.
सांगलीतील पुष्पराज चौकातील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्ली,सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ सांगली सिटी आणि आभाळमाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केला होता.त्यावेळी ते उपस्थितांसमोर बोलत होते.
यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या आयुष हेल्पलाइनचे अविनाश पवार आणि निर्धार फाउंडेशनचे राकेश दड्डनावर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशन काँग्रेसचे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, महाराष्ट्र राज्य वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष गवळी,
आभाळमाया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, जिल्हा शल्यचिकित्सक पृथ्वीराज कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुराधा मालानी, महेश पाटील, प्रितेश कोठारी, भाग्येश शहा, मयंक शहा, नागेश म्हारुगडे आदिंसह सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान ट्रक टर्मिनल मध्ये सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते वाहतूक नियमांची माहिती सांगणाऱ्या स्टिकर्सचे व बोर्डाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सांगली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव म्हणाले की, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये काम मोठे असून, प्रत्येकाने या नियमांचा काटेकोरपणे अवलंब केल्यास रस्ता अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास वाटतो.