Monday, December 23, 2024
HomeT20 World Cupटी-२० विश्वचषकात आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने घेतली हॅटट्रिक...आतापर्यंत या क्रिकेपटूंच्या नावावर हा रेकॉर्ड...

टी-२० विश्वचषकात आयर्लंडच्या जोशुआ लिटिलने घेतली हॅटट्रिक…आतापर्यंत या क्रिकेपटूंच्या नावावर हा रेकॉर्ड…

आजच्या T २० सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने टी-20 विश्वचषक सुपर-12 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या डावाच्या 19व्या षटकात त्याने ही कामगिरी केली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटनर यांच्या विकेट्स घेऊन लिटिलने ही कामगिरी केली. यासह लिटल हा कर्टिस कॅम्परनंतर हॅट्ट्रिक घेणारा दुसरा आयरिश गोलंदाज ठरला आहे.

2022 च्या टी-20 विश्वचषकातील ही दुसरी हॅटट्रिक आहे. यापूर्वी कार्तिक मयप्पनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

T20 विश्वचषकात हॅटट्रिक
ब्रेट ली विरुद्ध बांगलादेश केप टाउन 2007
कर्टिस कॅम्पर विरुद्ध नेदरलँड्स अबू धाबी २०२१
वानिंदू हसरंगा विरुद्ध दक्षिण आफ्रिका शारजा २०२१
कागिसो रबाडा विरुद्ध इंग्लंड शारजा 2021
कार्तिक मयप्पन विरुद्ध श्रीलंका जिलॉन्ग २०२२
जोश लिटल विरुद्ध न्यूझीलंड अॅडलेड २०२२

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: