iQOO Z9x 5G : iQoo चा नवीन स्मार्टफोन iQOO Z9x 5G भारतात लाँच झाला आहे. हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे, जो प्रगत फीचर्ससह येतो. फोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच 2MP डेप्थ कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
किंमत आणि उपलब्धता
iQoo Z9x 5G स्मार्टफोन दोन रंग पर्यायांमध्ये येईल, हिरवा आणि राखाडी रंग पर्याय. हे डिव्हाईस तीन रंगात वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये येईल. त्याच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत 12,999 रुपये आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत 14,499 रुपये आहे.
त्याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्याय असलेला फोन 15,999 रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन Amazon आणि IQ ऑनलाइन स्टोअरवरून खरेदी करता येईल. त्याची विक्री 21 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. फोनच्या खरेदीवर तुम्हाला रु. 1,000 इन्स्टंट डिस्काउंट ऑफरचा आनंद घेता येईल.
iQoo Z9x 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQoo Z9x 5G स्मार्टफोन ऑक्टाकोर 4nm स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेटसह येईल. फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आहे. तसेच 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे.
हा फोन Android 14 आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. फोनमध्ये 6.72 इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले पॅनल आहे. फोन 1080×2408 पिक्सेल रिझोल्युशनसह येतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.
फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 44W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते. फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर स्कॅनर देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
यासोबतच 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात येणार आहे. एक 8MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोन IP64 रेटिंगसह येतो. फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, 3.5mm ऑडिओ जॅक आहे. फोन यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्टसह येतो.