Thursday, December 26, 2024
HomeSocial Trendingछत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा इकबाल हकीम याची जामीनावर सुटका...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा इकबाल हकीम याची जामीनावर सुटका…

दि. २२/११/२०२२ रोजी मुर्तीजापुर शहरातील इकबाल हकीम सैफी नामक व्यक्ती ने अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा फोटो सोशल मिडिया वर पोस्ट केला होता.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर श्रद्धा व प्रेम करणाऱ्या असंख्य शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक होवून अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधित व्यक्ती वर गुन्हा दाखल करून, तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी विविध संघटने कडून होत होती त्या अनुषंगाने आरोपी इकबाल हकीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मुर्तीजापुर पोलिसांनी अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले.

आरोपीचे वतीने आज दिनांक २४/११/२०२२ रोजी न्यायालयात जामीन मिळण्याचा अर्ज दाखल केला गेला त्यास पोलिसांनी प्रखर विरोध दर्शविला व न्यायालयात सांगितले की आरोपी विरुद्ध चा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीस जामीन देण्यात येऊ नये.

आरोपीचे वकिलांनी न्यायालयात युक्तिवादा दरम्यान सांगितले की आरोपी सदर केस मध्ये खोटे फसविले असून त्याने कुठल्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला नसून कोणत्याही धर्माविरुद्ध भावना दुखावल्या जातील असे कृत्य सुद्धा केलेले नाही करिता आरोपीचा जामीन मंजूर होण्याची विनंती केली.

सरकारी पक्ष व आरोपी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी इकबाल हकीम याला जामीनावर सोडले. आरोपी इकबाल हकीम तर्फे मूर्तिजापूर येथील ॲड. सचिन वानखडे व ॲड. श्रीकृष्ण तायडे यांनी युक्तिवाद केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: