iPhone SE : जगातील सर्वात महागडा सर्वाधिक पसंदीचा फोन म्हणजे ॲपलचा आयफोन. मात्र आता स्वस्त दरात नवीन आयफोन लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन iPhone SE सीरीजचा नवीन स्मार्टफोन असेल. ॲपलचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन असेल असा दावा या अहवालात केला जात आहे. हा iPhone SE मालिकेतील चौथ्या पिढीचा स्मार्टफोन असेल. चला जाणून घेऊया फोनशी संबंधित सर्व तपशील…
iPhone SE Series 4 भारतात कधी लॉन्च होईल? सध्या याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, रिपोर्टनुसार, iPhone SE 4 वर काम सुरू झाले आहे.
रिपोर्टनुसार ॲपल आगामी iPhone SE 4 मध्ये काही मोठे बदल करू शकते. iPhone SE 4 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर फोनचा लूक खूपच प्रेक्षणीय असेल. तसेच, डिस्प्लेच्या बाबतीतही फोन उत्तम असण्याची अपेक्षा आहे. आगामी iPhone SE 4 ची रचना iPhone 14 सारखी असेल.
त्याच्या समोर आणि मागे फ्लॅट डिझाइन दिसेल. फोन कमी बेझलसह ऑफर केला जाऊ शकतो. फोनमध्ये फेस आयडी वापरला जाईल. तसेच iPhone SE 4 स्मार्टफोनमध्ये प्रथमच टाइप C चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो.
iPhone SE 4 स्मार्टफोन खूपच हलका असेल. जुन्या iPhone 14 स्मार्टफोनपेक्षा हा साधारण 6 ग्रॅम हलका असेल. रिपोर्टवर विश्वास ठेवला तर फोनचे वजन जवळपास 165 ग्रॅम असेल. Apple iPhone SE 4 स्मार्टफोनमध्ये 48MP रियर कॅमेरा सेटअप असेल. फोनला 5G कनेक्टिव्हिटी दिली जाईल.