iPhone ची क्रेझ देशात म्हणा किंवा इतर देशात खूप आहे. तर अनेकांच्या प्रतिष्ठेच प्रतिक हा फोन बनला आहे. त्याच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहतात आणि लॉन्च होताच ते खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. नुकताच iPhone-15 लॉन्च झाला आहे. ते विकत घेण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. ॲपल स्टोअर्स आणि मॉल्समध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर अनेक ठिकाणी ते घेण्यासाठी प्रचंड गोंधळ उडाला आहे. आता अमेरिकेतून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक ॲपल स्टोअर लुटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अनेक लोक एकत्र ॲपल स्टोअरमध्ये प्रवेश करतात, त्यानंतर लूटमार सुरू होते. ॲपल स्टोअरमध्ये ठेवलेले फोन उचलून लोक पळू लागतात. या सर्व लोकांनी मुखवटे लावून तोंड लपवले आहे. या मुखवटा घातलेल्या प्रत्येकाने किमान चार ते पाच आयफोन चोरले.
बाहेरून आलेल्या काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला. फोन लुटून बाहेर आलेले लोक किती फोन लुटले दुकानातून बाहेर पडल्यानंतर कॅमेऱ्यासमोर दाखवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी ॲपल स्टोअरमध्ये ठेवलेले लॅपटॉपही लोकांनी उचलून नेले. लूटमारीचा हा खेळ बराच काळ सुरू होता.
Apple store being looted in Philadelphia , US
— Yash (@Yashfacts28) September 27, 2023
Why these visuals are never globally reported? pic.twitter.com/YukAX9yiiJ
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. अमेरिकेसारख्या देशात अशी घटना घडल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याचवेळी काही लोक गंमतीने म्हणत आहेत की, दिवसभर रांगेत उभे राहूनही आयफोन मिळत नाही, मग बिचाऱ्यांनी काय करावे…
आयफोनबाबत अशा घटना उघडकीस आलेला हा पहिलाच व्हिडिओ नसला तरी याआधीही ॲपल स्टोअरमध्ये हाणामारी आणि भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.