Sunday, December 22, 2024
Homeराजकीयअदानी समूहातील सरकारी बँकांच्या गुंतवणुकीची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा - सांगली...

अदानी समूहातील सरकारी बँकांच्या गुंतवणुकीची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा – सांगली काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी…

सांगली – ज्योती मोरे

अदानी उद्योग समूहात एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यावधींची गुंतवणूक करण्यास सरकारने भाग पाडले आहे .यामध्ये एलआयसीच्या 29 हजार कोटी गुंतवणूकदारांचा तर स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा समावेश आहे.

अदानी समूहातील आर्थिक गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालानुसार संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष खोत यांनी केलीय.आज या संदर्भात सांगली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान सर्वसामान्य माणसाची आयुष्यभराची गुंतवणूक अदानी सारख्या माणसाला देऊन देशाला लुटण्याचं काम सध्याच्या सरकारकडून झाल्याने याची ईडी चौकशी झालीच पाहिजे अशीही मागणी खोत यांनी केली.

यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले ,बापूसाहेब चौधरी ,मौलवी वंटमोरे,अॅड. भाऊसाहेब पवार ,लालसाब तांबोळी,विठ्ठलराव काळे,विश्वासराव यादव, पैगंबर शेख,अरुण पळसुले,ओबीसी संघटनेचे अशोक रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: