देशाची राजधानी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूणाकृती पुतळा, २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण…
ठाणे – प्रफुल्ल शेवाळे
नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
सर्वोच्च न्यायालया चे सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने सदर पुतळा स्थापन होणार आहे.. हरियाणातील मानेसर इथं हा पुतळा बनवण्यात आला असून त्याचं कामही आता पूर्ण झालं आहे. त्यामुळं २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपर्दी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच अनावरण होणार आहे. सात फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी संविधानाची प्रत हातात घेतली आहे..
सर्वोच्च न्यायालय परिसरात देशाच्या घटनाकाराचा पुतळा उभारणे म्हणजे समस्त भारतीयांकरिता एक अभिमानाची बाब म्हणावी लागेल..