जि.प.उच्च प्राथमिक शाळा,थुंगाव (निपाणी) पं.स.नरखेड
२० विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत घेतली
नरखेड – अतुल दंढारे
ग्रेट भेट उपक्रमांतर्गत नरखेड तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, थुंगाव (निपाणी) येथील 20 विद्यार्थ्यांना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री ना.नितिन गडकरी यांची मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे नितीन गडकरी यांनी दिली.ही भेट काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या पुढाकारातून संपन्न झाली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना गडकरी म्हणाले, बघणे,ऐकणे व बोलण्यातून ज्ञान मिळत असते.शिक्षणाचा व यशस्वी होण्याचा कोणताही संबंध नाही, आधुनिक युगात नवनवीन कौशल्य आत्मसात करा.
गडकरी नव्हे रोडकरी या उपाधिबद्दल काय सांगाल या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी कोणीही चांगलं म्हटलं तर हुरळून जात नाही व वाईट म्हटलं तर वाईट वाटत नाही.रिस्पेक्ट हा शून्यातून निर्माण होतो.आयुष्यात समाजातील लोकांचे चांगलं करणे हेच माझे ध्येय आहे असे सांगितले. राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे गडकरी अनुभवताना देशातील शेतकरी अन्नदाता आहे त्यांना ऊर्जावान करा.तेव्हाच देश बलवान होईल.
राजकारण म्हणजेच समाजकारण आहे.व समाजकारण म्हणजे राष्ट्रकारण आहे.८०%समाजकारण व २०% राजकारण मुळे देशाचा विकास होतो असे उत्तर विद्यार्थ्यांना मिळाले. अगदी शैक्षणिक प्रवासापासून सुरू झालेली मुलाखत साहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक पान उकलत होती. मुलाखतीच्या सुरुवातीला कु. नूतन गोरे या विद्यार्थिनीने साहेबांचा ओघावता जीवनपट व ग्रेट भेट उपक्रमाचा हेतू संचालनातून मांडला. आभार प्रदर्शन करतांना उद्याच्या यशस्वी भारताचे संशोधक, स्पर्धक आणि सुसंस्कृत नागरिक होण्याची ग्वाही कू सलोनी चौधरी हिने दिली.
काही विद्यार्थ्यांनी मुलाखतीचा अनुभव जपानी आणि जर्मन भाषेत व्यक्त केल्याने सर्व उपस्थित अवाक झाले. एकूणच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनाला टेकलेला असल्याचे पाहायला मिळाले.या वेळी भाजपा उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण चरणसिंग ठाकुर, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे,जिल्हा परिषद नागपूर चे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे, निलेश शहाकर,राजेंद्र टेकाडे,संदीप बागडे , vstf जिल्हा समन्वयक किरण भोयर यांच्यासह पार्थ हिवसे, यश चौधरी, रिया चौधरी, प्रथमेश चौधरी, सारंग देशमुख, कार्तिकी नागपुरे, आरुषी टेकाडे, दिव्या देशमुख, नयन देशमुख, हृषिकेश पुरी, अंशू ढोले, विपुल बडोदेकर, आर्या डिग्रसकर, दुर्गेश डिग्रसकर,योगिता गोरे, विधी सिरस्कार, चैताली चौधरी, उपस्थित होते.
जि.प.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रशंसनीय होता.गडकरी साहेबांचा जीवनप्रवास मुलांनी मुलाखतीतून उलगडला.साहेबांनी, देशाच्या विकासासाठी ‘आत्मनिर्भर’ होण्याचा सल्ला दिला.विद्यार्थ्यांच्या आयुष्याला प्रेरणा देणारी मुलाखत संपन्न झाली.
— चरणसिंग ठाकूर
उपाध्यक्ष, भाजपा, नागपूर जिल्हा