सांगली – ज्योती मोरे.
सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या गेल्या दहा वर्षात रेकॉर्डवर असलेल्या चोरी, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न,दरोडा, घरफोडी, शस्त्र कायद्यानुसार रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे विस्तृत चौकशी करून, इंटरोशन फॉर्म भरून घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिल्यानुसार आज सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अशा गुन्हेगारांना बोलावून ते सध्या काय करतात याची चौकशी करून त्यांचे इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले.
या सर्व आरोपींवर यापुढे बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.सदर आरोपींपैकी 48 जणांवर सीआरपीसी 107 प्रमाणे आणि तीन जणांवर सीआरपीसी 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही सदर मोहीम वरचेवर राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.