प्रा.मोनिका उमक
डिव्हाईन इव्हेंट यांनी जागतिक महिला दिन आणि होळीचे औचित्य साधून 12 मार्च रविवार ला हरिगंगा लॉन वर अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात रंगरसिया या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.डिव्हाईन इव्हेंट्स फाउंडर राधा ढेकेकर आणि केतकी वानखडे आहेत तसेच रंगरसिया चे आयोजन प्रा.मोनिका उमक,राधा ढेकेकर ,केतकी वानखडे,स्नेहल सुने ,डॉ शीतल चौधरी, माधुरी धर्माडे ,शुभांगी कावडे, यांनी केले होते.
या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत पंजाबी ढोलच्या तालावर रंग लाऊन होळीच्या शुभेच्छा देत तसेच महिलांना उपहार स्वरूपात फुलांचा गजरा देत मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच प्रत्येकाच्या हातात रंगरसियाचा बँड बांधून त्यांचे स्वागत केले. रंगरसिया या कार्यक्रमात फोम डांस, रेन डांस ,डीजे डांस,फॅशन शो,ग्रुप डांस,झुंबा एरोबिक डांस,अश्या अनेक प्रकारच्या मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या.सोबतच वेलकम कोल्डड्रिंक्स, नास्ता करीता गरम गरम पकोडे,तसेच भेळ सुध्या देण्यात आली.
तुर्कीश आइस्क्रीम आणि मस्त खमंग वर्हाडी जेवण देण्यात आले.या कार्यक्रमाला जवळपास 450 हुन अधिक लोक उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला . रंगरसियामध्ये प्रत्येकाने रेन डांस,फोम डांस चा मनसोक्तपणे आनंद लुटला. तसेच राज फिटनेस झुंबा आणि एरोबिक डांस वर प्रत्येकाने ताल धरला .पोलीस महिला ग्रुपच्या डांसने तर प्रेक्षकांना चे मन जिंकले.लेझी ग्रुप डांस ने प्रत्येकाला हसवले.
तसेच स्वरा ढेकेकर,तिषा सुने,तेशा अडकणे,सौम्या या बाल कलाकारांनी शास्त्रीय डांस ते फिल्मी डांस असे विविध डांस चे सादरीकरण करून आपले कलेचे सादरीकरण केले. युवा वर्गाने फॅशन शो मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यात कोणी कृष्ण तर कोणी राधा बनून आले होते.
यात द्रव नेभनानी या बालक कलाकाराने रॅप सादर केले. डिव्हाईन इव्हेंट कडून प्रत्येक सहभाग घेण्याऱ्या कलाकारांना मा.किरणभाऊ पातूरकर ,संध्या ताई टिकले,नानकराम नेभनानी यांच्या हस्ते मोमेंट देण्यात आले. या वेळी डिव्हाईन ग्रुप कडून शासकीय मेडिकल कॉलेज अमरावती ला मिळून दिल्याबद्दल किरणभाऊ पातूरकर यांचा पण सत्कार करण्यात आला. रंगरसिया या कार्यक्रमाला किरणभाऊ पातूरकर, संध्याताई टिकले,नानकराम नेभनानी, चंद्रकांत पोपट यांनी विशेष उपस्थिती लावली.
डिव्हाईन ग्रुप कडून विशेष आभार अविनाश मार्डीकर यांचे तसेच पंकज कलेक्शन, ए-मिस्टर ,नरदेव ,लतिका रियलिस्ट, कॅफे गोवा ,कृष्णा सुपरबाझर आणि कॅमेरामन लिगोड, प्रथमेश पवार यांचा सहयोग होता.उत्कृष्ट सूत्रसंचालन सुषमा कोठीकर यांनी केले.रंगरसिया च्या आयोजकांनी या पुठे असेच कार्यक्रम आयोजित करण्याचे मानस व्यक्त केले.