सांगली – ज्योती मोरे.
जागतिक महिला दिनानिमित्त विनायक नगर येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीताई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून सुरुवात करण्यात आली स्वागत गीत सौ. लताताई पाटील अध्यक्षा सहेली महिला मंडळ व सविता जरीमल्ली यांनी सादर केले. कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करत असलेल्या महिला मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.
मा. निवेदिता ताई ढाकणे अध्यक्षा म.बा. क.समिती सांगली मा. वर्षाताई कुलकर्णी विविध बाबींमध्ये पारितोषिक विजेता प्राप्त मा. ज्योतीताई अदाटे नगरसेविका सा.मि.कु. महानगरपालिका सांगली कु. काजल सरगर गोल्ड मेडल प्राप्त विजेता मा. अनुजा गोखले सामाजिक कार्यकर्ता इत्यादी प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ति उपस्थित होते त्यांचे शाल श्रीफळ व पुष्प रोप देऊन सत्कार करण्यात आला प्रथम सौ. लता ताई पाटील यांनी महिला दिन का साजरा केला जातो व महिला मंडळ कामकाजाबाबतची प्रस्तावना त्यानंतरसर्व मान्यवरांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामकाजाबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले.
महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये ज्योती चव्हाण वैशाली सूर्यवंशी सुलभा पंडित अनुपमा चांदूरकर मनीषा बाबर निर्मला पाटील इत्यादी स्पर्धाकानी स्पर्धेमध्ये यश मिळवले त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे कामकाज अलका लागू यांनी पाहिले. कार्यक्रमास विनायक नगर विजयनगर मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यामध्ये पद्मजा मालाणी भोसले ताई वासंती चोपडे अनिता चव्हाण श्रीदेवी संजीव स्नेहा संजीव श्रेया तिल्याळकर अश्विनी तिल्याळकर इ. महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कुलकर्णी व समारोपाचे काम अॅड. जयश्री हेबळे यांनी पाहिले