- गुरुकुल कॉन्व्हेंट जलालखेडा येथे कार्यक्रमाचे आयोजन.
- विरपत्नी डॉ अर्चना कळंबे व सुषमा राऊत यांचा केला सत्कार.
नरखेड (ता.8)
गुरुकुल कॉन्व्हेंट जलालखेडा यांच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मी बाई, इंदिरा गांधी, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुुरवात करण्यात आली. महिला दिनानिमित्त महिला पालकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नृत्य स्पर्धा, गितगायन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या.
तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या जलालखेडा येथील विरपत्नी डॉ. अर्चना कळंबे व महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा राऊत यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सत्कार करण्यात आला. नृत्य स्पर्धेमध्ये चेतना रेवतकर प्रथम तर किरण बनकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिभा काळे, गीतगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक सोनाली यावले तर द्वितीय क्रमांक अल्मा अक्रम शहा तर वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निकी शाह हिने पटकावला.
यावेळी उपस्थिती पाहुण्यांनी महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आज ची स्त्री कुठेच मागे नाही. आजची नारी अबला नसून ती आजची सक्षम स्त्री आहे. स्त्रीने फक्त चूल नि मुलं न करता आपल्यात लपलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला विरपत्नी डाँ. अर्चना कळंबे, आदर्श शिक्षिका अनिता हिवरकर, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा राऊत,
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा दंढारे ,सरला निंबूरकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा दंढारे , सूत्रसंचालन विजया रेवातकर तर आभार प्रदर्शन सरला निंबूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य घेतले.
महिलांन मध्ये खूप मोठी ताकत आहे. त्यांनी मनात आणले तर त्या काही पण करू शकते. त्यामुळे महिलांनी सु-संस्कृत उद्याची नवीन पिढी घडवण्याची गरज आहे. असे आव्हान यावेळी त्यांनी केले. अनिता हिवरकर आदर्श शिक्षिका.