रेस्क्यू टीम ने घेतली सीएमडी श्री मनोज कुमार यांची भेट…
शरद नागदेवे
10 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत अमेरिका, व्हर्जिनिया येथे झालेल्या 12 व्या अंतर्राष्ट्रीय खाण संरक्षण स्पर्धा-2022 (IMRC – 2022) मध्ये, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) संघाने माइन्स रेस्क्यू स्किल प्रकारात तिसरा क्रमांक मिळविला. वेकोलिच्या रेस्क्यू टीम ने या अंतर्राष्ट्रीय स्पर्धेत कोल इंडिया लिमिटेडचे प्रतिनिधित्व केले. वेकोलिच्या विविध क्षेत्रातील 10 कर्मचारी या टीमचा भाग होते. अंतर्राष्ट्रीय खाण संरक्षण स्पर्धा-2022 मध्ये 09 देशांतील 22 संघ सहभागी झाले होते.
अमेरिकेहून परतलेल्या विजयी रेस्क्यू टीमने आज 26.09.2022 रोजी सीएमडी श्री मनोज कुमार यांची भेट घेतली. श्री कुमार यांनी विजयी संघाचे कौतुक करत त्यांना भविष्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विजयामुळे कर्मचार्यांचे मनोबल वाढेल आणि सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विजयी संघाला अंतर्राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव सर्वांसोबत शेअर करण्यास त्यांनी सांगितले.
यावेळी डायरेक्टर टेक्निकल (योजना व परियोजना) श्री ए. के. सिंह व महाप्रबंधक (खनन/रेस्क्यू) श्री पी. के. चौधरी उपस्थित होते. त्यांनी रेस्क्यू टीमला विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
यापुर्वी ही वेकोलिच्या रेस्क्यू टीमने 2018 साली IMRC मध्ये “मोस्ट अॅक्टिव्ह रेस्क्यू टीम” हा किताब पटकावला होता. आपले कौशल्य दाखवत वेकोलिच्या खान संरक्षण विभागाने अनेक वेळा लोकांचे जीव व मालमत्तेचे रक्षण केले आहे. विशेषत: परासिया येथील पेट्रोल पंपाजवळील ज्वेलर्सच्या दुकानाला लागलेली आग विझवणे, नागपूर व्हीएनआयटीच्या प्रदर्शनादरम्यान एका विद्यार्थिनीचे प्राण वाचवणे, भद्रावती येथील तेलाच्या गोदामाला लागलेली आग विझवणे इत्यादी घटना उल्लेखनीय आहेत.
अंतर्राष्ट्रीय खाण संरक्षण स्पर्धा-2022 मध्ये वेकोलिच्या रेस्क्यू टीममध्ये श्री बी. शिवकुमार, मुख्य प्रबंधक (खनन), श्री दिनेश बिसेन, सुपरिंटेंडेंट (रेस्क्यू), श्री शेख मुजाहिद आजम, उप प्रबंधक (खनन), श्री एम. विष्णु, सहायक प्रबंधक (खनन), श्री तेज बहादुर यादव, माइनिंग सरदार, श्री संतोष पाटले, ओवरमैन, श्री आशीष शेलारे, माइनिंग सरदार, श्री हरिचंद रायसोनिया, माइनिंग सरदार, श्री पुष्पराज विश्वकर्मा, माइनिंग सरदार व श्री राजेश पथे, माइनिंग सरदार यांचा संघात समावेश होता.