Friday, November 22, 2024
HomeFoodsInternational Mens Day | मनसोक्त रडून घे... तुझ्यातला पुरुष जप..!

International Mens Day | मनसोक्त रडून घे… तुझ्यातला पुरुष जप..!

प्रेरणा सुनील

“पुरुष” नावाचं अस्तर बाजूला सारलं तर तुझ्यावर उमटलेल्या कित्येक रेषा माझ्या ओळखीच्या आहेत. तुझ्या बॉसने सर्वांसमोर तुझा अपमान केला, जिवापाड प्रेम करणारी प्रेयसी सोडून गेली, जबाबदारीचं ओझं नको वाटलं तेव्हा तू गिळत राहिलास अश्रु मूकपणे! पण तुझ्या या बिनअस्तरी कातडीवर खरेपणाच्या रेषाच मला जास्त भावतात. त्या जगापासून लपवण्याची तुझी धडपड व्यर्थ आहे. पोकळ भक्कमपणापेक्षा छोट्या बाबतीतली तुझी खरीखुरी संवेदनशीलताच तुला खरा पुरुष करते. “हे बायकी”,”हे पुरुषी” अश्या वर्गीकरणात अडकून पडू नकोस.

तुला गुलाबी रंग आवडतो, तुला स्वयंपाक करायला आवडतं, तुला क्रिकेटपेक्षा आई कुठे काय करते डेली सोप आवडते, तुझ्या वागण्या बोलण्यात नाजूकपणा आहे ह्या गोष्टींवरूनही ते धरतील तुला टीकेच्या कात्रीत. ते जबरदस्तीने तुला बसवतील त्यांच्या सो कॉल्ड “पुरुष” गटात! पण काळा-निळा रंग आवडुन, क्रिकेटचं वेड लावून, ताकदीचेच कामं करून,छाती फुगवून ,फुटकळ शक्ति प्रदर्शन करून पुरुष होता येत नसतं.

पुरुष होण्यासाठी धमण्यांत संवेदनशीलता असावी लागते. सामाजिक पुरुषिपणाचं अस्तर फाडून अस्सल कातडीवरच्या रेषारेषांत पुरुष झळकावा लागतो. तुझ्यात रुजलेली सेनसिटीव्हीटी अबाधित राहू दे! अगर तुम साथ हो गाणं ऐकताना ,बघताना माझ्याइतकं रडू तुलाही आलंच तर चॅनेल बदलू नकोस. मनसोक्त रडून घे. तुझ्यातला पुरुष जप!

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: