रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे २३ जानेवारीला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस व राज्य क्रीडा दिनानिमित्त कबड्डी स्पर्धा घेण्यात आली.
याप्रसंगी प्राचार्य सोनिराम धोटे यांचे मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक प्रशांत पोकळे यांचे संयोजनात पूर्व माध्यमिक गटात मुलामुलींच्या आंतरवर्गीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. यात मुलींमध्ये इयत्ता सहावीच्या टीमने प्रथम स्थान पटकाविले तर मुलांमध्ये इयत्ता सातवीची चमू अंतिम विजेता ठरली.
शाळेचे शिक्षक साक्षोधन कडबे यांनी समालोचन केले. खेळाडू विद्यार्थी अंशुल तुपट व दीपांशू पंधराम यांनी पंच म्हणून तसेच शिक्षक नीलकंठ पचारे यांनी मुख्य पंच म्हणून भूमिका पार पाडली.
याप्रसंगी शिक्षक राजीव तांदूळकर, प्रा.अरविंद दुनेदार, दिलीप पवार, अमित मेश्राम, सौ. अर्चना येरखेडे, करीना धोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी मोरेश्वर दुनेदार, राशिद शेख आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.