रामटेक – राजु कापसे
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक, मनसर सर्कल, वाहिटोला येथे पोषण अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी जयसिंगजी जाधव, जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे, सरपंच ऊर्मिला खुडसाव, नितीन बंडीवार, शुक्लाजी, ग्राम पंचायत सदस्या मेश्राम, जांबुळकर व इतर सदस्या उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमात मुलीच्या जन्माचे स्वागत, गरोदर माताचे स्वागत , आहार प्रदर्शनी, कार्यक्रमावर आधारीत रांगोळी, पोषण रॅली, शाळेतील विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले . वेषभुषा असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना पोषण अभियान का राबविण्यात येत आहे,
आहारातील घटक व घटकांचा समावेश दैनंदिन आहारामध्ये कशा रीतीने करावा, हिरव्या पालेभाज्या चा आहार मध्ये समावेश कसा करावा, आहार ,आरोग्य व स्वच्छता, गरोदर स्तनदा व ६ महिने ते ६ वर्ष लाभार्थी चा आहार कसा असावा याबद्दल सविस्तर माहिती मनसर सर्कल च्या पर्यवेक्षीका संगिता चंद्रिकापूरे यांनी सांगीतली.
नाविन्य पुर्ण दिपप्रज्वलन करण्यात आले .उत्तम पोषन, देश रोषन या विषयावर जि.प.सदस्य डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षिय संभाषण खुडसाव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिना डोनारकर यांनी केले. प्रास्ताविक संगिता चंद्रिकापूरे पर्यवेक्षिका मनसर सर्कल यांनी केले तर आभार अनुपमा बिसने यांनी केले.रानु शेंडे यांनी मुलांचे कार्यक्रम तर गावातील महिलांनी आहार प्रदर्शनी लावून कार्यक्रमाची जागृती केली.मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.
रानु शेंडे, कौतिका परतेती, रिना डोनारकर, रेषा सलामे, ममता बंसोड , अनुपमा बिसने, संघमित्रा मेश्राम, राऊत, तुंबलवार, वाडिभस्मे, आकरे, मारबते , जयमाला चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले तर वासनिक,कोटांगळे, चाफले,कठौते, गावंडे, मलघाटे, ढोक,बिसेन,कुंभरे ,रहांगडाले व ईतर सेविका मदतनीस यांनी सहकार्य केले.