नागरी सत्कार समितीचे आयोजन…
डिजिटल ग्रामचे लोकार्पण…
नरखेड – अतुल दंढारे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकौशल्य पासून प्रेरित होऊन सैन्यात दाखल झालो.भारतीय नौदल जगात पाचव्या क्रमांकावर आहे.व २०४७ पर्यत प्रथम क्रमांकावर येईल.नौदलात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असून यामुळे भारताची शस्त्रांची ताकद वाढलेली आहे.असे प्रतिपादन भारतीय नौदल उपप्रमुख सतिश नामदेवराव घोरमाडे यांनी लाडगांव येथे सत्कारास उत्तर देतांनी दिले.
तालुक्यातील लाडगांव येथील भुमिपुत्र भारतीय नौदल उपप्रमुख सतिश नामदेवराव घोरमाडे यांचा नागरी सत्कार समिती , लाडगांव कडून भव्य सत्कार करण्यात आला.तसेच डिजिटल ग्रामचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.अनिल बोंडे तर सत्कारमूर्ती सतिश घोरमाडे प्रमुख अतिथी म्हणून सीएसआर संचालक अंकुर मल्होत्रा, कर्नल डॉ.राजेश अढाऊ, कॅप्टन नामदेवराव घोरमाडे, अरविंद रिधोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नागरी सत्कार समिती,ग्रामपंचायत, माजी सैनिक संघटना,स्वराज्य संघटना,कुणबी सेवा संघ, संताजी सांस्कृतिक संस्था, प्रथम एज्युकेशन संस्था, वारकरी भजन मंडळ यांचेकडून सतिश घोरमाडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात डॉ.अनिल बोंडे म्हणाले, देशाची सेवा शेतकरी व सैनिक करतो म्हणून देशातील जनता सुखी आहे.सैनिक देशाच्या भूमातेचे रक्षण करतो तर शेतकरी जमिनीतून अन्न पिकवितो.देश आत्मनिर्भर होण्याकरिता देशातील शेतकरी सुखी असणे आवश्यक आहे.
यावेळी पंतप्रधान रॅली,दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाला सहभागी झालेले एन सी सी कॅडेट रित्त्विक अनिल पोहकार व मार्गदर्शक कॅप्टन डॉ.तेजसिंह जगदळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम संयोजक संदीप सरोदे, संचालन राजेंद्र टेकाडे व वैष्णवी ठाकरे तर आभार प्रदर्शन निलेश रिधोरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जि.प.सदस्या मिनाक्षी सरोदे, पं. स.सदस्या प्रतिभा ठाकरे, प्रकाश वंजारी, भीमराव येनूरकर, देवेंद्र धोटे,संजय कुमरे,पद्माकर धुर्वे, दत्तू चौरे, यादव मानकर, मोहन राऊत,अरुण डोईजोड,शेषराव मिसळकर,निलेश वंजारी, आदींनी सहकार्य केले.